राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागा अंतर्गत सर्वात जास्त गुन्हे नाशिक विभागात
सापळा अंतर्गत १९२ एकूण गुन्हे २५० आरोपींची नोंद
अमरावती: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यावर्षीचा तीन महिन्याचा अहवाल आपल्या वेबसाईटवर समाविष्ट केला असून त्यात १ जानेवारी ते ५ एप्रिल पर्यंत १९६ एकूण गुन्हे तर २६४ एकूण आरोपीची नोंद झालेली आहे.
राज्यात सापळा अंतर्गत एकूण गुन्हे १९२ आरोपी २५०, असंपदा अंतर्गत एकूण गुन्हे ३ आरोपी ३ व अन्य भ्रष्टाचारा अंतर्गत एकूण गुन्हे १ व आरोपी १ नोंद आहे.
यात राज्यातील आठ परिक्षेत्राची माहिती दिलेली असून, सर्वात जास्त गुन्हे हे नाशिक विभागात सापळा अंतर्गत ३२ गुन्हे घडले असून ४७ आरोपी आहेत. तर सर्वाधिक कमी गुन्हे हे नागपूर विभागात १३ गुन्हे व १७ आरोपी आहेत.
सोबतच असंपदा अंतर्गत ३ गुन्हे हे मुंबई विभागात घडले असून यात ३ आरोपीची नोंद आहे. तसेच अन्य भ्रष्टाचारा अंतर्गत औरंगाबाद विभागात १ गुन्हा व १ आरोपीची नोंद आहे.
संपूर्ण गुन्हे व आरोपींचा गोषवारा खालील प्रमाणे
source : acb website

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा