अमरावतीकारांना गतवर्षी पेक्षा यंदा उन्हाचे चटके अधिक
पंधरा वर्षांतील सर्वोच्च तापमान
अमरावती: उन्हाळ्याची सुरुवात झाली असू गतवर्षी पेक्षा यंदाच्या एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढताना दिसत असल्याने अमरावतीकारांची आगे ने होळी होत आहे.
सामान्यत: एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात अमरावतीत पारा ४४ अंशाच्या आसपास असतो. मात्र यंदा तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर पोहोचला. ५ तारखेला शहरातील कमाल तापमान ४४.१ सें असून किमान तापमान २७ सें इतके होते. जे की मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहे.
विदर्भातील हे शहर सुद्धा आता चंद्रपूर शहराच्या बरोबरीने येताना दिसत आहे. यामुळे शेतातील पिकांना सुद्धा उन्हाचा चांगलाच तडका बसताना दिसतो आहे. कित्येक ओलितांचे पीक जळून खाक होत आहे. सोबतच जनावरांना सुद्धा यामुळे चारा मिळत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी सुद्धा घरा बाहेर निघताना स्वतःची काळजी घेत मसालेदार तेलकट पदार्थ, खाणे टाळणे महत्वाचे असून निंब पाणी इत्यादी रस पित स्वतःची काळजी घेणे महत्वाचे आहे.
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा