पोस्ट्स

राज्यात सर्वाधिक खाटा नाशिक जिल्हा रुग्णालयात

इमेज
 पाच जिल्ह्यात सर्वाधिक कमी खाटा  अमरावती, ता.९, राम वाडीभष्मे: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील जिल्ह्यांना वेगेवगळ्या खाटा उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून यामध्ये एकूण २३ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.  सर्वाधिक खाटा ह्या ६२३  नाशिक जिल्ह्यात आहेत. तर सर्वात कमी वाशीम , गोंदिया, हिंगोली, सिंधुदुर्ग व नंदुरबार येथे २०० खाटा आहेत.  करोना काळात आरोग्या करिता खाटा बघता ही संख्या अजूनही कमीच आहे. करोना काळात कित्येक खाजगी रुग्णालयांना कोविड केअर सेंटर म्हणून शासनाने मान्यताप्राप्त केलं होतं. पुन्हा नव्याने हरियाणा दिल्ली राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज वाढती लोकसंख्या आणि नवीन येणाऱ्या रोगांना लक्षात घेत शासनाने यात वाढ करणे गरजेचे आहे.  माहितीचा स्रोत : आरोग्य विभाग वेबसाईट

अमरावतीकारांना गतवर्षी पेक्षा यंदा उन्हाचे चटके अधिक

इमेज
पंधरा वर्षांतील सर्वोच्च तापमान अमरावती: उन्हाळ्याची सुरुवात झाली असू गतवर्षी पेक्षा यंदाच्या एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढताना दिसत असल्याने अमरावतीकारांची आगे ने होळी होत आहे. सामान्यत: एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात अमरावतीत पारा ४४ अंशाच्या आसपास असतो. मात्र यंदा तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर पोहोचला. ५ तारखेला शहरातील कमाल तापमान ४४.१ सें असून किमान तापमान २७ सें इतके होते. जे की मागील वर्षीच्या तुलनेत वाढले आहे.  विदर्भातील हे शहर सुद्धा आता चंद्रपूर शहराच्या बरोबरीने येताना दिसत आहे. यामुळे शेतातील पिकांना सुद्धा उन्हाचा चांगलाच तडका बसताना दिसतो आहे. कित्येक ओलितांचे पीक जळून खाक होत आहे. सोबतच जनावरांना सुद्धा यामुळे चारा मिळत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.  नागरिकांनी सुद्धा घरा बाहेर निघताना स्वतःची काळजी घेत मसालेदार तेलकट पदार्थ, खाणे टाळणे महत्वाचे असून निंब पाणी इत्यादी रस पित स्वतःची काळजी घेणे महत्वाचे आहे.

जल जीवन मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात ७१ टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी

इमेज
राज्यात मार्च २०१९पर्यंत ग्रामीण भागातील एकूण घरांपकी केवळ ३८ टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचत होते.                फोटो स्त्रोत :   JJM Dashboard अमरावती ,   राम वाडीभष्मे   :   पाण्यासाठी गावागावात महिलांची आणि लहान मुलांची होणारी वणवण थांबविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान   नरेंद्र मोदी   सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी   ‘ जल जीवन मोहिमे’   अंतर्गत   महाराष्ट्राने   प्रगती करत ७०.९० टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचविण्यात यश मिळवले आहे. केंद्र आणि राज्य यांच्या प्रत्येकी ५० टक्के भागीदारीतून राबविल्या जाणाऱ्या मोहिमेचा लाभ सर्वाधिक बिहारने घेतला. या योजनेअंतर्गत १ कोटी ५७ लाख ४० हजार ३३० घरांमध्ये (एकूण घरांच्या ९१.४० टक्के) बिहारने पाणी पोहोचविले.   ही योजना सुरू झाली तेव्हा म्हणजे मार्च ,   २०१९ मध्ये राज्यातील साधारणपणे ५० लाख घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होत होता. आता महाराष्ट्रातील १ कोटी ४२ लाख घरांपकी १ कोटी ३ लाख ५७ हजार ६५१ घरांमध्ये नळाद्वारे ...

राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागा अंतर्गत सर्वात जास्त गुन्हे नाशिक विभागात

इमेज
सापळा अंतर्गत १९२ एकूण गुन्हे २५० आरोपींची नोंद अमरावती: लाचलुचपत प्रतिबंधक विभागा ने यावर्षीचा तीन महिन्याचा अहवाल आपल्या वेबसाईटवर समाविष्ट केला असून त्यात १ जानेवारी ते ५ एप्रिल पर्यंत १९६ एकूण गुन्हे तर २६४ एकूण आरोपीची नोंद झालेली आहे.   राज्यात सापळा अंतर्गत एकूण गुन्हे १९२ आरोपी २५०, असंपदा अंतर्गत एकूण गुन्हे ३ आरोपी ३ व अन्य भ्रष्टाचारा अंतर्गत एकूण गुन्हे १ व आरोपी १ नोंद आहे. यात राज्यातील आठ परिक्षेत्राची माहिती दिलेली असून,  सर्वात जास्त गुन्हे हे नाशिक विभागात सापळा अंतर्गत ३२ गुन्हे घडले असून ४७ आरोपी आहेत. तर सर्वाधिक कमी गुन्हे हे नागपूर विभागात १३ गुन्हे व १७ आरोपी आहेत.  सोबतच असंपदा अंतर्गत ३ गुन्हे हे मुंबई विभागात घडले असून यात ३ आरोपीची नोंद आहे. तसेच अन्य भ्रष्टाचारा अंतर्गत औरंगाबाद विभागात १ गुन्हा व १ आरोपीची नोंद आहे. संपूर्ण गुन्हे व आरोपींचा गोषवारा खालील प्रमाणे source : acb website